

दालमिया प्रशासनाने एफआरपीप्रमाणे एकरकमी दर जाहीर करण्यास नकार दिल्यामुळे आंदोलन तीव्र झाले.
esakal
Sugarcane Protest : दालमिया आसुर्ले - पोर्ले साखर कारखान्याने जाहीर केलेला ३,५२५ रुपयांचा पहिला हप्ता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नाकारला. एफआपीनुसार जो काही दर होईल, त्यावर अतिरिक्त १०० रुपये आणि शासनाच्या मान्यतेने मागील ५० रुपये दर जाहीर करावा, अशी संघटनेची मागणी होती. मात्र, दालमिया प्रशासनाने एफआरपीप्रमाणे एकरकमी दर जाहीर करण्यास नकार दिल्यामुळे आंदोलन तीव्र झाले. त्यामुळे दालमिया साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक पूर्णपणे थांबली. रात्री उशिरा दीर्घ चर्चेनंतर एफआरपीनुसार ३,६३४.८३ रुपयांचा एकरकमी दर जाहीर करून तोडगा निघाला.