

Waterproof Rakhi Envelopes
esakal
कोल्हापूर: भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचा उत्सव असलेल्या रक्षाबंधनाचे स्वरूप आता बदलत चालले आहे. केवळ राखी पाठवण्यापुरते मर्यादित न राहता, दूरदेशी असलेल्या लाडक्या भावाला राखीसोबत छोटीशी भेटवस्तू, सुका मेवा, कपडे किंवा एखादी खास आठवण पाठवण्याचा नवा ट्रेंड बहिणींमध्ये पाहायला मिळत आहे. दूर असलेल्या या भावांपर्यंत राखीसोबतच बहिणींचे हे प्रेम, आपुलकी आणि भेटवस्तू कोणत्याही अडथळ्याविना पोहोचवण्यासाठी टपाल विभाग ‘वॉटरप्रूफ’ लिफाफे, ‘पार्सल पॅकेजिंग’ सुविधेसह सज्ज झाला आहे.