'पोटॅश'च्या दरवाढीचा पंतप्रधान कार्यालयाने खुलासा करावा

नेहमीप्रमाणे मोदींनी फसवले असा शेतकऱ्यांचा समज होईल
'पोटॅश'च्या दरवाढीचा पंतप्रधान कार्यालयाने खुलासा करावा

कोल्हापूर : केंद्र शासनाने खत उद्योगाला अनुदान देत डीएपी खताची किंमत पुर्ववत केली. मात्र एमओपी (पोटॅश) या खताची किंमत मात्र प्रति बॅग १२५ रूपयांनी वाढलेलीच आहे. त्याचं काय? पंतप्रधान कार्यालयाने याचा खुलासा करावा, अन्यथा नेहमीप्रमाणे मोदींनी फसवले असे शेतकऱ्यांचा समज होईल. असे ट्विट खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.

'पोटॅश'च्या दरवाढीचा पंतप्रधान कार्यालयाने खुलासा करावा
'तौक्ते'च्या थरारनाट्याचे 85 साक्षिदार

खत उद्योगाने दरवाढ केल्यानंतर देशभरातून या दरवाढीच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. या दरवाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार असल्याने स्वाभिमानीसह अन्य संघटनांनी जोरदार आंदोलनाची तयारी केली होती. मात्र पंतप्रधान मोदी यांनी याची दखल घेत खत अनुदान वाढविण्याचे जाहीर केले होते. यामुळे काही खतांच्या किमती कमी होणार असल्या तरी सगळ्याच खताच्या किंमती कमी होणार नसल्याचे शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिले आहे. पोटॅश सारख्या खताची किंमत वाढलेलीच आहे. याचे काय असा सवाल राजू शेट्टी यांनी केंद्राला विचारला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com