
Mother Kills 8 Month Infants
esakal
रत्नागिरीतील धक्कादायक घटना – कारवांचीवाडी पारसनगर येथे आईने ८ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात बोळा कोंबून गुदमरवून हत्या केली.
मानसिक आजाराची पार्श्वभूमी – पती परदेशात असल्याने आई माहेरी राहत होती व तिच्यावर मानसिक आजाराचे उपचार सुरू होते; बाळ सतत रडत असल्यामुळे हा प्रकार घडल्याचे तपासात स्पष्ट झाले.
गुन्हा दाखल – पोलिसांनी शाईन आसिफ नाईक (वय ३६) या आईला ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे; या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.
Ratnagiri Infant Deaths News : ''माता न तू वैरिणी'', या म्हणीचा प्रत्यय आज रत्नागिरीतील कारवांचीवाडी पारसनगर येथे आला. आईने ८ महिन्यांच्या बाळाच्या तोंडात बोळा कोंबून त्याचा खून केला. मुलगी रडायची थांबत नसल्यामुळे तिने हे कृत्य केल्याचे तपासात पुढे आले आहे. काल रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली.