आटपाडीच्या तरुणाने केले ‘ऑपरेशन गंगा’चे सारथ्य

एअर इंडियाच्या विमानातून १८० भारतीय विद्यार्थ्यांना मायभूमीत आणले; आटपाडीशी नाळ अजूनही घट्ट
russia ukraine war operation ganga evacuation of 180 indians Atpadi Pratik Aiwale Air India
russia ukraine war operation ganga evacuation of 180 indians Atpadi Pratik Aiwale Air Indiasakal

आटपाडी : युक्रेनमध्ये युद्धात अडकलेल्या भारतीयांना मायभूमीत आणण्यासाठी केंद्र सरकारने राबविलेल्या ऑपरेशन गंगामध्ये आटपाडीच्या सुपुत्राने आघाडीची भूमिका पार पाडली. त्याने एअर इंडियाच्या विमानातून १८० भारतीय विद्यार्थ्यांना मायभूमीत आणणाऱ्या विमानाचे सारथ्य केले. या तरुणाचे नाव प्रतीक ऐवळे आहे. प्रतीक ऐवळे एअर इंडियामध्ये सहावर्षांपासून पायलट म्हणून सेवेत कार्यरत आहे. त्याचे वडील मुंबईतच नोकरी करतात. त्यामुळे प्रतीकचे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच झाले आहे.

मात्र, आटपाडीशी त्याची नाळ अजूनही घट्ट जोडलेलीच आहे. त्यामुळेच आटपाडीत त्याचा आणि त्याच्या वडिलांचा कल्लेश्वर मंदिराच्या सभागृहात गावकऱ्यांनी सत्कार केला. समाज कल्याणचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर आणि अनिल पाटील यांनी या सत्काराचे आयोजन केले होते.युक्रेनमध्ये युद्धात अनेक भारतीय विद्यार्थी नागरिक अडकले आहेत. त्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा मोहीम राबवली. या मोहिमेत पायलट म्हणून प्रतीक ऐवळे याने सहभाग घेतला होता. २८ फेब्रुवारीला प्रतीक भारतीय विद्यार्थ्यांना मायभूमीत घेऊन येण्यासाठी विमान घेऊन रुमानियाकडे रवाना झाला होता.

या विमानात १८० विद्यार्थी बसले. त्यांना घेऊन प्रतीक इराण मार्गे भारतात पोचला. दोन टप्प्यांत त्यांचा विमान प्रवास झाला. या प्रवासात आलेला अनुभव, विद्यार्थ्यांची अवस्था आणि मातृभूमीवर असलेले प्रेम त्याने सत्कारप्रसंगी आटपाडीकरांसमोर कथन केले. तेथे भारतीय दूतावासाने विद्यार्थ्यांना एकत्रित केले होते. सारे विद्यार्थी भयभीत आणि चिंताग्रस्त होते. विद्यार्थ्यांची सोय केली होती, तरीही चेहऱ्यावर भीती होती. भारताचे विमान विमानतळावर पाहताच तरुणांनी ‘भारत माता की जय’च्या जोरदार घोषणा दिल्या, असे त्याने सांगितले. मात्र या प्रवासात विद्यार्थ्यांशी जवळून संवाद साधता आला नसल्याचीही त्याने खंत व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com