Sakal Foundation Day: शेती-उद्योगांच्या संतुलनातून शाश्वत विकास शक्य : प्रा. एस. महेंद्र देव; ‘सकाळ’चा ४६ वा वर्धापन दिन दिमाखात

Agriculture Industry Balance Says S Mahendra Dev: शेतीतील उत्पादकता, प्रक्रिया उद्योग व निर्यात वाढवून रोजगारनिर्मितीला चालना; कृषिपूरक उद्योग, कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ आणि डिजिटल पायाभूत सुविधांमुळे विकसित भारताचे स्वप्न साकारण्याचा प्रा. महेंद्र देव यांचा भर
Sakal 46th Foundation Day Celebration Professor S Mahendra Dev Stresses Sustainable Growth Through Agriculture Industry

Sakal 46th Foundation Day Celebration Professor S Mahendra Dev Stresses Sustainable Growth Through Agriculture Industry

sakal

Updated on

कोल्हापूर: ‘‘देशातील ४६ टक्के लोकसंख्या रोजगारासाठी शेतीवर अवलंबून आहे; मात्र सकल राष्ट्रीय उत्पन्नातील शेतीचा वाटा अवघा १७ टक्केच आहे. शेतीच्या वृद्धीसाठी गुणवत्तापूर्ण उत्पादने, प्रक्रिया उद्योग आणि निर्यात वाढविणे गरजेचे आहे. शेती आणि उद्योगांच्या संतुलित विकासातून शाश्वत विकासाचे भारताचे स्वप्न साकारेल,’’ असा ठाम विश्वास पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रा. एस. महेंद्र देव यांनी आज येथे व्यक्त केला. ‘सकाळ’च्या ४६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात प्रा. देव यांनी ‘भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने आणि संधी’ या विषयाची मांडणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com