महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची माफी मागावी - समरजितसिंह घाटगे I Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Politics

'महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची माफी मागावी'

कोल्हापूर : मराठा समाजाची आरक्षणाबाबत फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने समाजाची माफी मागावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. मागासवर्गीय आयोगाचे काम त्वरित सुरू न झाल्यास लवकरच लढा उभारला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा: कोनशिलेवर लिहलं होतं हसन 'मुस्त्रीफ'; अजितदादांनी लावला कपाळाला हात

घाटगे म्हणाले, 'विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठपुरावा केला. मराठा समाजाला न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण त्यांनी २०१८ ला समाजाला मिळवून दिले. त्याचा मराठा समाजातील मुलांना शिक्षण व नोकरीत फायदा झाला. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला निधीची तरतूद केली. व्याज परताव्याची योजनेसह सारथी संस्थेला शिष्यवृत्ती देण्याबाबत पाठपुरावा केला. सरकार बदलल्यानंतर मराठा आरक्षणाची बाजू महाविकास आघाडी सरकारला मांडता आली नाही. परिणामी आरक्षण रद्द झाले.'

ते म्हणाले, 'आरक्षण रद्द झाल्यानंतर किती बैठका झाल्या? किती विद्यार्थ्यांना शुल्कात सवलत मिळाली? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांच्या नियुक्त्यांचे काय झाले ? अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आर्थिक तरतूद किती झाली? किती वसतिगृहांचे भूमीपूजन झाले? सारथीला किती निधी मिळाला? मागासवर्गीय आयोगाच्या किती बैठका झाल्या, या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यायला हवीत.'

हेही वाचा: "नव्या वर्षात आघाडी सरकार जाऊन 'भाजप'ची सत्ता येईल"

loading image
go to top