
गडहिंग्लजची प्रसिद्ध ‘संकेश्वरी’ मिरची यंदा नांदेडच्या शेतांमध्ये फुलली आहे.
esakal
Kolhapur Brand : लांबसडक, लालभडक संकेश्वरी मिरची ही गडहिंग्लची ओळख आहे. स्थानिक जात म्हणूनही त्याकडे पाहिले जाते; पण हीच संकेश्वरी मिरची नांदेड जिल्ह्यात चांगली फुलली आहे. हिमायतनगर (जि. नांदेड) तालुक्यातील ५० शेतकऱ्यांनी संकेश्वरी मिरचीचे पीक घेतले आहे. नवी जात आणि उत्पादनही चांगले असल्याने स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे.