Ladki Bahin Yojana : सतेज पाटील यांना लाडकी बहीण योजना आवडली नाही? म्हणाले, योजनेने आमचा कार्यक्रम केला

Satej Patil : सतेज पाटील यांची लाडकी बहीण योजनेवर टीका; शिक्षण खात्याला आवाहन केले आहे. कोल्हापुरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

esakal

Updated on
Summary

हायलाइट समरी पॉइंट्स

सतेज पाटील यांचे आवाहन – “सतत आंदोलक बनवू नका, भविष्यात प्रश्न सोडवण्याच्या बाजूला बसू द्या” असे शिक्षण खात्याकडे आवाहन.

शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर – विद्यार्थ्यांचे स्क्रीन टायमिंग कमी व्हावे म्हणून डिजिटल माध्यमातून चांगल्या गोष्टी पोहोचवण्याचा सल्ला; शिक्षकांना एआय व डिजिटल साक्षरतेत अपडेट होण्याची गरज.

आसगावकरांचे कार्य आणि शाहू महाराजांची टीका – शिक्षक आमदार आसगावकर यांनी संपूर्ण निधी शाळांसाठी वापरल्याचे कौतुक; तर शाहू महाराजांनी विरोधकांना केवळ ५% डीपीडीसी निधी दिला जात असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

Satej Patil Criticizes Ladki Bahin Yojana : ‘राज्याच्या शिक्षण खात्यात काय चाललंय माहीत नाही. असू दे...तसं चालायचंच. कारण लाडकी बहीण योजनेने आमचा कार्यक्रमच केला आहे; पण वेगवेगळ्या माध्यमातून आमचा संघर्ष सुरू आहे. तुमच्या अडचणी मांडायच्या, प्रश्नांसाठी रस्त्यावर यायचे, हे सध्या आमच्या नशिबात आहे. २०२९ पर्यंत आमचा हा संघर्ष सुरूच राहील, तो आम्ही करत राहू. मात्र, प्रश्न मांडण्यासाठी सतत आम्हाला आंदोलकाच्या भूमिकेत ठेवू नका, भविष्यात प्रश्न सोडवण्याच्या बाजूला बसण्याची संधी द्या’, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com