
थोडक्यात :-
कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाची पुढच्या वर्षी निवडणूक असल्याने आतापासूनच सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि विरोधात असलेले महादेवराव महाडिक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. महादेवराव महाडिक यांनी दिल्लीतून गोकुळच्या निवडणुकीसाठी फिल्डिंग लावली आहे तर सतेज पाटील यांनीही ग्रामीण भागातील ठराव धारकांच्या गाठीभेटी वाढवल्या आहेत.