

‘शक्तिपीठ’ विषयावर सरकार एक पाऊल मागे घेतल्याची चर्चा
esakal
Shaktipeeth Mahamarg : (प्रवीण देसाई) :‘शक्तिपीठ’ महामार्गाला होणारा तीव्र विरोध लक्षात घेऊन राज्य सरकारने एक पाऊल मागे घेतल्याचे चित्र आहे. सर्वाधिक विरोध असणाऱ्या कोल्हापूरसह सांगली व सोलापूर जिल्ह्यांतून जाणाऱ्या मार्गात बदल शक्य आहे. त्यासाठी हिटणी, चंदगडमार्गे दोडामार्गपर्यंतच्या नवीन मार्गाचा विचार सुरू असल्याचे दिसत आहे, परंतु शक्तिपीठ महामार्गविरोधी संघर्ष समिती संपूर्ण १२ जिल्ह्यांतील महामार्ग रद्द करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे.