Shaktipeeth Highway Clash in Kolhapur
esakal
कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गावरून माजी खासदार राजू शेट्टी व शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यातील वादातून शिवाजी चौकात या दोन्हीही नेत्यांच्या समर्थकांत जोरदार राडा (Raju Shetti Rajesh Kshirsagar Dispute) झाला. क्षीरसागर यांच्या निषेधार्थ आंदोलन करून परत निघालेल्या शेट्टींच्या कार्यकर्त्यांसह त्यांच्या वाहनांवर क्षीरसागर समर्थकांनी लाथा, बुक्क्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने शिवाजी चौकात प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला केल्याने अनर्थ टळला.