esakal | शिंदीचा वृक्षाला आला बहर! नीऱ्यापासून काय आहेत फायदे वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदीचा वृक्षाला आला बहर! नीऱ्यापासून काय आहेत फायदे वाचा सविस्तर

शिंदीचा वृक्षाला आला बहर! नीऱ्यापासून काय आहेत फायदे वाचा सविस्तर

sakal_logo
By
अमोल सावंत

उजळाईवाडी (कोल्हापूर) : सरनोबतवाडीजवळ असलेल्या राजाराम तलावाच्या खालील बाजूस शिंदीच्या (खजुरी) वृक्षाचं (palm Tree)वन बहरुन आले आहे. पिवळेजर्द घोष असलेल्या शिंदीची फळ अक्षरश: लगडलेली आहेत. कोणाचाही चटकन लक्ष वेधले जाते, या लगडलेल्या शिंदीकडे. तलावाच्या खालील बाजूस शिंदीच्या वृक्षांची गर्दी दिसते. ही झाडे जिथे शुष्क प्रदेश आहेत, तिथे दिसतात; मात्र अलिकड शिंदीचे प्रमाण कमी झालेले आहे. कारण शिंदीचा वृक्ष कोणीही मुद्दामहून लावत नाही. बागायत केली जात नाहीत.

Shindi palm tree historical information marathi news

नीऱ्यापासून हे आहेत फायदे

शिंदीपासून नीरा मिळतो. नीरा हे पेय शरिराला अतिशय चांगले असत. विशेषत: उन्हाळ्यात नीरा पिण्यासाठी वापरला जातो. पुणे, नगर जिल्ह्यात नीरा मिळविण्यासाठी शिंदीच्या झाडाच्या वरील बाजूस एक मडके ठेवले जाते. या मडक्यात रात्रभर नीरा साठतो. दुसऱ्या दिवशी सकाळी या नीऱ्याचे भांडे खाली उतरवून विक्रीसाठी ठेवले जाते. नीऱ्यापासून मिळणारी साखर मधासारखी गोड असते अन्‌ पौष्टिकही असते. इथे कोल्हापूर जिल्ह्यातील जरी शिंदीची झाडे दिसत असली तरी कोणीही नीरा काढत नाही. नीऱ्याची विक्री करत नाही. खरेतर नीऱ्यापासून अर्थप्राप्ती होते. ज्यांच्याकडे ही झाडे आहेत, त्यांना नीऱ्यापासून अर्थप्राप्ती करता येईल.

हेही वाचा- Good News: शिराळाच्या आयसेरा बायोलॉजिकल कंपनीचा दावा! कोरोना होणार आता छु मंतर

खजुरी, शिंदी ताड

नीऱ्यापासून ताडी, गुळीसाखर तयार केली जाते. नीरा विकण्यासाठी शहर परिसरात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. पण शिंदीकडे लक्ष दिले पाहिजे. असा हा बहुगुणी वृक्ष कळंबा तलाव, कोरोची, हातकणंगले, शिरोळ परिसर, श्री जोतीबा डोंगर आदी भागात तुरळकपणे दिसतो. शिंदीला खजुरी, शिंदी ताड असेही म्हणतात.हा ताड कुळातील वॄक्ष असून भारत, बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ येथे आढळतो.

शिंदी ताड इ.स. पूर्व ४००० वर्षापासून अरेबिया, आफ्रिकेमधील भटक्या जातींचे मुख्य अन्न होता. शिंदीचे नर आणि मादीचे वृक्ष वेगळे असतात. दोन्हींवर फेब्रुवारी ते मे महिन्यात ८-१० फुलोरे येतात. नर फुले दाटीने येतात; पण मादी फुले विरळ असतात. आता राजाराम तलावाच्या खाली जे शिंदीचे वन दिसते, तिथे फळांचे लगड लागलेले आहेत. सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान फळे पक्व होतात. फळे एक इंच लांबीचे असून त्यात एक उभी लंबोडी खाच असते. यातली बी फारच मोठी असते. फळावरील खाण्यायोग्य गर फार कमी असतो; पण पक्षी, लहान मुलांचे ते आवडते खाद्य आहे. पक्व झालेली शिंदी खाण्यासाठी राजाराम तलावावर मुले येतात.

‘‘शिंदीचे अनेक प्रकार आहेत. शिंदीच्या झाडापासून तरटी, नीरा असे पदार्थ मिळतात. अनेक पक्षी घरट्यासाठी शिंदीला प्राधान्य देतात.’’

-प्रा. डॉ. मधुकर बाचुळकर

Shindi palm tree historical information marathi news