
Shivsena Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्ह्यात महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर वातावरण तापू लागले आहे. आमदार सतेज पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे काँग्रेसचे गट नेते शारंगधर देशमुख यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश आज होत आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, सत्यजित कदम यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रवेश होणार आहे. शारंगधर देशमुख यांच्याबरोबर काँग्रेसचे आणि इतर पक्षातील आजी -माजी नगरसेवकांचा गट असणार आहे.