

कोल्हापुरात धावत्या वाहनावर बिबट्याने अचानक उडी घेतल्याने महिला गंभीर जखमी.
esakal
Kolhapur Leopard News : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून बिबट्यांच्या वाढत्या संख्येने चिंतेचा विषय बनला आहे. मागच्या महिन्यात पन्हाळा तालुक्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. तर कोल्हापूर शहरात एक बिबट्या आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. हातकणंगले तालुक्यातील घुणकी येथील एका मळ्यात दिड महिन्यांपासून बिबट्या वास्तव्यास असल्याच्या घटना ताज्या असतानाच काल संध्याकाळी (ता.२०) पन्हाळा तालुक्यातील केकतवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात अनिता शिवाजी गवड (वय ४०, रा. बादेवाडी, ता. पन्हाळा) जखमी झाल्या. प्राथमिक उपचारानंतर त्यांना रात्री उशिरा कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले.