तात्पुरती मदत नको, जॉब शोधुया; अंध कालाकाराचे 'युट्यूब' वर आवाहन

अंध कालाकाराचे ‘युट्यूब' वर आवाहन; नोकरी देणाऱ्यांचा आणि पाहिजे असणाऱ्यांचा बनला सेतू
तात्पुरती मदत नको, जॉब शोधुया; अंध कालाकाराचे 'युट्यूब' वर आवाहन

कोल्हापूर : ‘तात्पुरती मदत नको, एक चांगला जॉब शोधुया‘ ही अंध कलाकाराची त्यांच्या अंध मित्रांसाठी आणि उद्योजकांसाठीची एक हाक. तीही थेट यूट्यूबव्दारे. (you tube) गुगलच्या लिंकद्वारे. (google) सध्या अंध कलाकार असो किंवा अंधमित्र यांच्या हाताला काम नाही. (blind actors) काहींची आई तर काहींचे वडील आजारी आहेत. काहींचे व्यवसाय ही बंद पडले आहेत. त्यासाठीच शुभम चौगुले या अंध कलाकाराने थेट युट्यूब चॅनेलद्वारे सर्व अंधमित्रांना नोकरी शोधण्याची संधी दिली आहे.

कोरोनामुळे (covid 19 effects) व्यवसाय बंद पडले आहेत. काहींच्या कंपन्या बंद पडल्यामुळे अंधमित्रांवर उपासमारीची वेळ आली. दानशुरांनी त्यांच्यासाठी धान्याचे किट आणि इतर मदत केली पण याहीवर्षी पुन्हा कोरोना आणि महापुराने डोके वर काढल्यामुळे मदत करणाऱ्यांवर ही मर्यादा येत आहेत. अशी मदत किती दिवस घेत राहणार ? त्यामुळेच शुभम याने थेट युट्यूब चॅनेलद्वारे व्यथा समाजा समोर मांडली आहे. स्वतः अंध आहे, अंधासाठी नोकरीची मागणी तो या व्हिडीओच्या माध्यमातून करत आहे. अंध असलेल तरीही त्यांना स्मार्ट फोन हाताळता येतो. हे दाखविण्याचे काम ही याच युट्यूब व्हीडिओच्या माध्यमातून आणि लिंकद्वारे शुभमने केले आहे. त्याने आता ऑनलाईनच्या माध्यमातून समाजाला हाक दिली आहे. तीही तात्पुरत्या मदतीची नव्हे तर कुवतीनुसार, शिक्षणानुसार नोकरी देण्याची.

तात्पुरती मदत नको, जॉब शोधुया; अंध कालाकाराचे 'युट्यूब' वर आवाहन
कोल्हापूर जिल्ह्यात निर्बंध 'जैसे थे'; वीकेंड लॉकडाउन कायम

काम, नोकरी शोधणांचा सेतू

ज्या कंपन्या अंधांना नोकरी देवू शकतात त्यांच्यासाठी एक लिंक तयार केली आहे. त्यात त्यांना कोणत्या पद्धतीचे काम करणारी व्यक्ती पाहिजे हे विचारले आहे. तसेच ज्यांना काम पाहिजे आहे, अशा अंध मित्रांना ते काय काम करू शकतात, त्यांचे शिक्षण काय आहे?, कोणत्या भागात त्यांना नोकरी पाहिजे याचीही माहिती दिली आहे. यानुसार कंपन्या देणाऱ्याचा आणि नोकरी शोधणांचा सेतू शुभमने तयार केला आहे.

"मी अंध कलाकार आहे. स्वतःचा वाद्यवंद होता. मात्र कोविडमुळे तो बंद पडला. अंध म्हणून अनेकांनी हातभार लावला. पण आता नोकरी दिली तर माझ्यासारख्या आणखी २५-५० तरुणांचे कुटुंब चालेल. यासाठी ज्या अंधांना नोकरी पाहिजे, आणि जे नोकरी देवू शकतात त्यांचा सेतू बनण्याचे काम मी केले आहे."

- शुभम चौगुले

तात्पुरती मदत नको, जॉब शोधुया; अंध कालाकाराचे 'युट्यूब' वर आवाहन
'पुढच्या वेळेस दाढी लावून येईन', मनसे आमदार राजू पाटलांचा एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com