...तरच कोल्हापुरातील कोरोना रूग्णांची संख्या होईल कमी

solution on corona positive patients increased kolhapur
solution on corona positive patients increased kolhapur
Updated on: 

कोल्हापूर : शहरातील कोरोनाचा समुह संसर्ग कमी करण्यासाठी कोरोनामुळे किंवा कोरोना कक्षात मृत्यु झालेल्या व्यक्तीचा मृतदेह थेट रूग्णालयातून स्मशानभुमीत अंत्यसंस्कारासाठी नेण्याची गरज आहे. शहरात गेल्या दहा - बारा दिवसात कोरोनाच्या वाढलेल्या निम्म्याहून अधिक रूग्णांत अशा कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तींचा मृतदेह घरी नेलेल्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. त्यासाठी महापालिकेने पुढाकार घेऊन किंबहुना सक्तीने कोरोनाने मृत्यु झालेल्या व्यक्तीचा मृतदेह थेट अंत्यसंस्कारासाठी नेण्याची उपाययोजना करावी. 

शहरातील गंजीमाळ परिसरात एका महिलेचा मृत्यु झाला. संबंधित महिलेचा कोरोनाचा अहवाल पॉझीटीव्ह आला. त्याच महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी झाली. या गर्दीतील संबंधित महिलेच्या नात्यातील लोकांसह सुमारे 20 ते 22 लोकांचा कोरोनाचा अहवाल पॉझीटीव्ह आला. अशीच स्थितीत कदमवाडी येथील एका व्यक्तीच्या मृत्युनंतर मृतदेह घरी नेल्यानंतर पहायला मिळाली. बावड्यात तर एका तरूणाचा मृतदेह डॉक्‍टरांनी घरी नेऊ नका असे सांगूनही घरी नेला, या मृतदेहावर पडून महिला आणि त्यांचे नातेवाईक रडले, यातील सात जण पॉझीटीव्ह आले. ही काही प्रातिनिधीक उदाहरणे आहेत, पण यातून कोरोनाचा मोठा समुह संसर्ग झाल्याचे पहायला मिळाले. 

आज शहरात सरकारी आणि खासगी रूग्णालयातही पुरेसे बेड नाहीत. दुसरीकडे रोज रूग्णांच्या किंवा कोरोनामुळे मृत्यु झालेल्या लोकांच्या संपर्कात आलेल्यांची संख्याही वाढत आहे. अशा परिस्थितीत नव्याने येणाऱ्या रूग्णांना बेड मिळत नाहीत. काल ह्रदय विकाराच्या झटक्‍याने मृत्य झालेल्या नगरसेवक संतोष गायकवाड यांच्या वाट्यालाही सीपीआरमध्ये हीच स्थिती आली. बेड उपलब्ध होईपर्यंत त्यांचा मृत्यु झाला.

कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तीचा मृतदेह अतिशय व्यवस्थित प्लॅस्टीकच्या कागदात गुंडाळून, शरीराचा कोणताही भाग दिसणार नाही असा दिला जातो, मृतदेह दिल्यानंतर संबंधितांना तो घरी न नेण्याची सुचनाही केली जाते पण त्याचे पालन होत नसल्याचे आतापर्यंतच्या अनेक प्रकारातून दिसून आले. यासाठी महापालिका प्रशासनानेच पुढाकार घेऊन कोरोनाग्रस्त व्यक्तीचा मृतदेह थेट स्मशानभुमीत नेण्याची सक्ती करण्याची गरज आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com