
कोल्हापूर : कर्जमाफीनंतर ज्या शेतकऱ्यांना नवीन पिककर्ज मिळालेले नाही, अशा शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज द्यावे, लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत असताना त्यांना वाऱ्यावर सोडू नका, अशा सूचना राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज दिल्या. सरकार शेतकऱ्यांच्या मागे खंबीर आहे, एकाही शेतकऱ्याला कृषी योजनांपासून अलिप्त ठेवले जाणार नाही, अशीही ग्वाही श्री भुसे यांनी दिली. खरीप हंगामाच्यापार्श्वभूमीवर राज्यभर कृषी आढावा घेतला जात आहे. यापार्श्वभूमीवर कृषीमंत्री श्री भुसे यांनी येथील शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील खरीपाचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
मंत्री भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना तात्काळ पिककर्ज पुरवठा झाला पाहिजे. युरिया खतावर लिंकिंग करणाऱ्यांवर कृषी विभागाने लक्ष ठेवले पाहिजे. ज्या गावात किंवा तालुक्यात युरियावर लिंकिंग करणारा विक्रेता सापडला तर संबंधीत दुकानासह कृषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. युरिया टंचाई दूर करण्यासाठी राज्यात 50 हजार टन युरियाचा बफर स्टॉक केला जाणार आहे. खत आणि बियाणे विक्री करणाऱ्या दुकानांसमोर दरफलक व उपलब्ध साठा लिहणे बंधनकारक करावे. तसेच पिककर्जासाठी प्रोत्साहनात्मक रक्कम मिळण्यासाठी कर्ज परतफेडीसाठी जून ऐवजी आणखी मुदत वाढ देता येते का पाहिली जाईल. यावेळी, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय भोसले, विजय देवणे उपस्थित होते.
शेतीमध्ये त्रिसुत्रीवर भर
शेतकऱ्यांना आनंदी व चिंतामुक्त करणार
शेतकऱ्यांची कसल्याही प्रकारे अडवणूक आणि फसवणूक होता कामा नये, अशी सक्त सूचना करुन कृषीमंत्री श्री. भुसे म्हणाले, शासनाने यंदाचे वर्ष उत्पादकता वर्ष म्हणून घोषित केले असून शेतीची उत्पादकता वाढ, दर्जेदार उत्पादन अणि शेतकरी ते ग्राहक थेट शेतीमालाची विक्री या त्रिसुत्रीवर शेती विभागाने भर दिला आहे. कृषी अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक दक्ष राहून यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करुन शेतकऱ्यांना आनंदी आणि चिंतामुक्त करण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
उसाचे अधिकाधिक क्षेत्र ठिबकवर आणण्यास प्राधान्य
उसाचे अधिकाधिक क्षेत्र ठिबकवर आणण्यास शासनाने प्राधान्य दिले असल्याचे सांगून कृषी मंत्री श्री. भुसे म्हणाले, ऊस ठिबकव्दारे घेतल्यास पाण्याची आणि श्रमाची बचत होणार आहे. याकामी सहकारी साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर योजना राबवावी, असे आवाहनही त्यांनी केले. शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज जोडणी तात्काळ मिळावी याविषयी बोलतांना ते म्हणाले, विद्युत विभागामार्फत लवकरच नवीन धोरण आणले जात असून यामध्ये वीज जोडणी तात्काळ देण्यावर भर देण्यात येणार आहे.
हे पण वाचा - जगात कोरोना अन् कोल्हापुरात पक्षांच्या जोरबैठका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.