
Sugar Season 2025 : यावर्षीचा साखर हंगाम सुरू होण्यापूर्वीच साखरेच्या हमीभावात वाढ करण्याच्या हालचाली केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने साखर संघ, राष्ट्रीय साखर महासंघाबरोबरच चार्टर्ड अकाऊंटंटकडून साखरेचा उत्पादन खर्च व प्रत्यक्ष मिळणाऱ्या दराविषयीची माहिती मागविली आहे.
दरम्यान, गेल्या सहा वर्षांत एफआरपीत मोठी वाढ झाली असताना साखरेचा हमीभाव मात्र प्रतिक्विंटल ३१०० रुपये आहे. यावर्षी हंगामापूर्वी साखरेच्या दरात वाढ झाल्यास साखर उद्योगाला तो मोठा दिलासा मिळणार आहे.