Sugar Season 2025 : साखर हंगाम एक नोव्हेंबरपासून, मंत्री समितीचा निर्णय; मुख्यमंत्री सहायता निधीत तिप्पट वाढ

Karnataka Sugar Season : कर्नाटकातही एक नोव्हेंबरपासूनच हंगाम सुरू होणार असल्याने सीमावर्ती भागातील कारखान्यांना दिलासा मिळाला आहे.
Sugar Season 2025

Sugar Season 2025

esakal

Updated on
Summary

ठळक मुद्दे : गेल्यावर्षीचा हंगाम

शेतकऱ्यांना ३१ हजार ३०१ कोटींची एफआरपी दिली, राज्यात एफआरपीची ९९.०६ टक्के रक्कम आदा

एफआरपी १०० टक्के दिलेल्या कारखान्यांची संख्या १४८, सहवीजनिर्मिती प्रकल्पातून २९८ कोटी युनिट वीजनिर्मिती

वीज निर्यातीपासून १९७९ कोटींचे उत्पन्न, इथेनॉल विक्रीपासून सहा हजार ३७८ कोटींचे उत्पन्न

Sugarcane Season : राज्यातील यावर्षीचा साखर हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन पाचऐवजी १५ रुपये कपातीचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. यापैकी प्रतिटन पाच रुपये पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचे ठरले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com