Kolhapur Farm : उसाला तुऱ्यांचा फटका; वजन घट आणि साखर उताऱ्यावर संकट, शेतकरी हवालदिल
Sugarcane Flowering Increases : अतिपाऊस, सततचा ओलावा आणि ढगाळ हवामानामुळे यंदा बहुतांश ऊस पिकांना तुरे फुटले असून वजन व साखर उताऱ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे.तुरा आलेला ऊस दीर्घकाळ शेतात राहिल्यास पांगशा फुटणे, ऊस पोकळ पडणे आणि साखरेचे विघटन होऊन उतारा घटण्याचा धोका वाढतो.
गारगोटी : वातावरणातील सततचे बदल, जास्त पाऊस आणि शेतातील कायम ओलावा यामुळे सध्या शिवार तुऱ्यांनी भरले आहेत. परिणामी ऊसाच्या वजनात व साखर उताऱ्यात घट होण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.