
Raju Shetti
esakal
२४ वी ऊस परिषद जाहीर – ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २४ वी ऊस परिषद गुरुवार, १६ ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर होणार आहे, अशी घोषणा राजू शेट्टी यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केली.
एफआरपी व साखर उद्योगावरील आरोप – गेल्या ५ वर्षांत एफआरपी वाढली असली तरी शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला नाही; खते, बियाणे, मजुरी यामध्ये वाढ, साखर कारखान्यांचे चुकीचे निर्णय व एफआरपी टप्प्याटप्प्याने देण्याचे प्रयत्न यावर राजू शेट्टींचा आरोप.
कायदेशीर लढाई व संघटनात्मक तयारी – उच्च न्यायालयात एकरकमी एफआरपीची लढाई जिंकली असली तरी राज्य सरकार व राज्य साखर संघ सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत; शेतकऱ्यांनी संघटित होऊन पुढील लढाई लढण्याची गरज असल्याचे आवाहन.
Kolhapur Raju Shetti : ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २४ वी ऊस परिषद जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर गुरुवारी, १६ ऑक्टोबर रोजी होणार असल्याची घोषणा, माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डन येथे गुरुवारी (ता. २५) झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात केली.