
Guardian Minister Photo : यापूर्वी जिल्हा बँकेच्या वार्षिक अहवालात जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी कोणत्याही पक्षाचे मंत्री असतील, तर त्यांचा फोटो छापला जायचा, हे वर्ष मात्र त्याला अपवाद ठरले आहे. जिल्ह्यातील मंत्री प्रकाश आबिटकर हे पालकमंत्री असूनही त्यांना अहवालात स्थान नाही. यावरून पालकमंत्री आबिटकर व बँकेचे अध्यक्ष वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील दुरावा कायम असल्याचे पुढे आले आहे. हे दोघेही महायुतीच्या घटक पक्षाचे मंत्री असूनही पालकमंत्री पदावरून असलेल्या नाराजीचे प्रतिबिंब यातून उमटल्याचे बोलले जाते.