
Kolhapur Political News : एका पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन थाटात झाले. काही वेळातच नव्याने पक्षात आलेल्या ‘हर्षल’ व्यक्तिमत्त्वाला पाहून कागलमधील नेत्याच्या पुत्राने थेट ‘याला का पक्षात घेतले’ असा सवाल उपस्थित केला. यामुळे तेथे शाब्दिक वाद झाला. गारगोटीच्या प्राचार्यांनी तेथे वेळीच प्रसंगावधान दाखवून मध्यस्थी केली आणि तो वाद शब्दांवरच थांबला. अन्यथा अंगावर धावून जाण्याची वेळ आली असती. कार्यक्रमानंतर या प्रकाराची चर्चा होती.