ब्रेकिंग ; करवीर निवासिनी आंबाबाई मंदिरात चोरी; चोरट्याला रंगेहात पकडले 

theft in kolhapur ambabai temple
theft in kolhapur ambabai temple
Updated on

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या दानपेटीतील पैसे चोरणाऱ्या वृद्धेला रंगेहात पकडण्यात आले आहे. चोरीची घटना मंदिराच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मंगल वाडकर असे चोरीचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धेचे नाव आहे. तिच्याकडून रोक रकमेसह चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी, आंबाबाई मंदिरात दर्शनासाठी हाजारो भाविक येत असतात. त्यामुळे मंदिरात रोजच गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेत वाडकर या महिने आंबाबाईचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने मंदिरात प्रवेष केला. दर्शन घेतल्यानंतर तिने तेथील दान पेठीतील पैसे आणि काही साहित्य चोरले. काही वेळातच तेथील सीसीटीव्हीत ही घटना दिसली. घटनेची माहिती मिळताच तेथील सुरक्षारक्षकांनी तिला पकडले. तिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने दानपेटीतून चोरलेली रक्कम आणि काही साहित्य सुरक्षारक्षकांना आढळून आले. ही रक्कम आणि चोरीच्या साहित्यासह महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. 

अचानकच घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. सुरक्षारक्षकांनी या घटनेची माहिती राजवाडा पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयीत महिलेकडे पोलिस कसून चौकशी करत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur flood situation latest
Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert
Panhala Police Act Swiftly After Huge Tree Falls Across Main Road
Kolhapur farmers oppose expressway project
Marathi News Esakal
www.esakal.com