

आजऱ्यातील धनगरवाड्यावर पाळीव जनावरांवर हल्ला, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण. वनविभाग सतर्क.
esakal
Ajra Kolhapur Forest : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून बिबट्या नागरीवस्तीत वारंवार आढळत असल्याने जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान आजरा तालुक्यात हरपवडे पैकी धनगरवाडा येथे वन्यप्राण्याने केलेल्या हल्यात रेडा ठार झाला आहे. येथील धनगर वसाहतीमधील भागोजी झोरे यांचा तो रेडा आहे. मंगळवारी (ता. १८) सायंकाळी साडेपाच वाजता जंगलात ही घटना घडली. हा हल्ला पट्टेरी वाघाने केल्याची शक्यता असून, येथे बिबट्याचा वावरही आहे. त्यामुळे वन विभागाच्या पथकाने घटनास्थळाची पहाणी केली.