Hupari Silver
Hupari Silveresakal

Hupari Silver : चांदीच्या 'हुपरी ब्रॅण्ड'ला 'जीआय'ची झळाळी! ब्रँडिंग, मार्केटिंगसाठी मदत, नक्कल रोखणार

हुपरीतील चांदी दागिने (Silver Jewelry) हस्तकला उद्योगाला ‘जी आय’ मानांकन प्राप्त झाले आहे.
Summary

कोल्हापुरी गूळ, आजरा घनसाळ, कोल्हापुरी चप्पलनंतर (Kolhapuri Chappal) आता हुपरीच्या चांदी (Hupari Silver) दागिने हस्तकला उद्योगास हा बहुमान प्राप्त झाला आहे.

हुपरी : शंभर वर्षांहून अधिक काळाचा इतिहास असलेल्या येथील चांदी दागिने (Silver Jewelry) हस्तकला उद्योगाला ‘जी आय’ मानांकन प्राप्त झाले आहे. येथील चांदी उद्योगाचे (Silver Business) प्रतिनिधित्व करणाऱ्या चांदी कारखानदार असोसिएशन, तसेच चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन आदी संस्थांनी यासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते. त्यांच्या या प्रयत्नांना मूर्त स्वरूप आले आहे.

जिल्ह्यातील कोल्हापुरी गूळ, आजरा घनसाळ, कोल्हापुरी चप्पलनंतर (Kolhapuri Chappal) आता हुपरीच्या चांदी (Hupari Silver) दागिने हस्तकला उद्योगास हा बहुमान प्राप्त झाला आहे. येथील चांदी हस्तकला उद्योग व्यवसाय शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करत आहे. शंभर वर्षांपूर्वी येथील एका कुटुंबापुरता मर्यादित असलेला हा हस्तकला व्यवसाय आजघडीला आजूबाजूच्या दहा ते पंधरा गावांत पसरलेला आहे.

Hupari Silver
प्रसिद्ध पर्यटनस्थळ गणपतीपुळे, आंबोळगडचा होणार विकास; सागरी मार्गाजवळील 105 गावात उभारणार 'इतकी' विकास केंद्रे

सध्या चाळीस हजारांवर कारागीर चांदी दागिने निर्मितीचे काम करतात. हस्तकलेवर तयार होणाऱ्या येथील अत्यंत सुबक व नक्षीदार कलाकुसरीच्या दागिन्यांनी देश-विदेशातील बाजारपेठ काबीज केलेली आहे. विशेषतः महिलावर्गात अढळ स्थान प्राप्त केलेल्या ‘पैंजण’ या दागिन्यांची बाजारपेठेत मोठी क्रेझ आहे. पैंजण या पारंपरिक दागिन्याबरोबरच करदोरे, वाळे, तोडे, जोडवी, मासोळ्या, वेडण्या, बिछवा आदी विविध प्रकारच्या दागिन्यांची निर्मिती येथे होते.

दर्जा, विश्वासार्हता आणि अचूकता या कसोट्यांमुळे हुपरीचे चांदी दागिने ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले आहेत. असे असताना बाहेरील काही पेठांमधून नक्कल करून, ते ‘हुपरी ब्रँड’ म्हणून ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होतो. गेल्या काही वर्षांपासून हा प्रकार सर्रास सुरू आहे. त्यामुळे येथील दागिन्यांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न पुढे आला होता. त्याचा नाहक त्रास व्यावसायिक व उद्योजकांना सोसावा लागत होता.

त्यामुळे येथील चांदी दागिन्यांना ‘जी आय’ मानांकन मिळवण्याची मागणी पुढे आली होती. त्यासाठी वाणिज्य व हस्तकला उद्योग व्यवसाय मंत्रालयाकडे चांदी उद्योगाशी संबंधित संस्थांचा पाठपुरावा सुरू होता. वाणिज्य व हस्तकला मंत्रालयाने अखेरीस या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. या मानांकनामुळे चांदी माल उत्पादकांना त्यांच्या मालाच्या ब्रँडिंग व मार्केटिंगसाठी मदत मिळू शकणार आहे.

Hupari Silver
Mental Health : ..तर बाळाच्या मेंदूची वाढ खुंटून मतिमंदत्व येऊ शकतं; यासाठी कशी काळजी घ्याल?

चांदी दागिने उद्योग जी आय मानांकन अंतर्भूत झाल्यामुळे यापुढे अन्य ठिकाणी बनविलेले दागिने ‘’हुपरीचे’’ दागिने म्हणून खपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला जरब बसणार असून तसा प्रयत्न केल्यास तीन वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि दोन लाखांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो.

जागतिक व्यापार संघटनेमार्फत जाहीर झालेल्या ‘जीआय’ मानांकन भौगोलिक संकेता करिता मुंबई येथे झालेल्या जी-२० परिषदेत मागणी केली होती. ही मागणी मान्य झाल्याने चंदेरीनगरी हुपरी खऱ्या अर्थाने जागतिक पातळीवर नावारूपास येणार असून, त्याचा चांदी उद्योजकांना नक्कीच फायदा होईल.

-रोहित देसाई, चांदी व्यवसाय व कर सल्लागार

जीआय मानांकनामुळे हुपरीच्या चांदी दागिन्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारकडून जीआय टॅग मिळालेला चांदीचा दागिना हुपरीत तयार झाला आहे, हे देशाबरोबर परदेशातही हक्काने सांगितले जाणार असून, हुपरीच्या दागिन्यांची नक्कल करणाऱ्यांवर कारवाईचा वचक बसेल.

-मोहन खोत, चांदी हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन, हुपरी

Hupari Silver
भारीच! शेतीकाम करणारा रोबोट अन् दिव्यांगांची स्मार्ट व्हीलचेअर; न्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून महत्त्वपूर्ण संशोधन

दागिन्यांची वैशिष्ट्ये

  • २०१५-१६ मध्ये शासनाकडे ‘जीआय’ मानांकनाची मागणी

  • सहा हजारांच्या आसपास निर्मिती उद्योजक

  • येथील चांदी उद्योगात चाळीस हजारांवर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कारागीर कार्यरत

  • पैंजण तयार करण्यासाठी २८ ते ३० कारागीर लागतात

  • कच्च्या चांदीची आटणी काढण्यापासून ते कंपनी, सूत, पास्ता, साखळी, डिझाईन, पॉलिश आदी विविध प्रकारच्या तीस प्रक्रिया केल्यानंतर पैंजण हा दागिना आकारास येतो

  • लता, कोयना, पंखा, टोपी, गुणमाला, गजश्री, रुपाली आदी नमुन्यातील दररोज शेकडो किलो पैंजणची निर्मिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com