Sulkud Water Scheme
Sulkud Water Schemeesakal

Sulkud Water Scheme : 'आम्ही सावित्रीच्या लेकी'चे उपोषण स्थगित; मुश्रीफांनी फोनवरून साधला आंदोलकांशी संवाद

सुळकूड योजना कार्यान्वित करावी, यासाठी सहा-सात महिन्यांपासून शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे.
Summary

सुळकूड योजना कृती समितीने आंदोलन स्थगित करण्यासाठी बैठकीची ठोस तारीख देण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे आंदोलन स्थगितीबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

इचलकरंजी : शहरासाठी मंजूर झालेल्या सुळकूड पाणी योजनेचे काम तत्काळ सुरू करावे, या मागणीसाठी ‘आम्ही सावित्रीच्या लेकी महिला गटा’तर्फे सोमवारपासून सुरू असलेले उपोषण (Women Agitation) जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठक घेण्याच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले.

आयुक्त ओमप्रकाश दिवटे व प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आंदोलकांना देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यास प्रतिसाद देत आंदोलन मागे घेतले. आंदोलन स्थगित केले असले तरी सुळकूड योजना (Sulkud Water Scheme) पूर्णत्वास जाईपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

Sulkud Water Scheme
Udayanraje Bhosale : पश्चिम घाटातील धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनस्थळांसाठी तब्बल 381 कोटी; खासदार उदयनराजेंची माहिती

सुळकूड योजना कार्यान्वित करावी, यासाठी सहा-सात महिन्यांपासून शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. तरीही दखल घेतली जात नसल्याने महिलांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यातून सोमवारपासून (ता. १९) आम्ही सावित्रीच्या लेकी गटाच्या सावित्री हजारे, शोभा इंगळे, सुषमा साळुंखे व ज्योत्स्ना भिसे यांनी महात्मा गांधी पुतळा चौकात बेमुदत उपोषणास सुरुवात केली होती. गुरुवारी आंदोलनास पाठिंबा दर्शवत सुळकूड योजना कृती समितीने रास्ता रोको आंदोलन केले.

Sulkud Water Scheme
Nitin Gadkari : भविष्यात बेळगाव जिल्हा बनणार इथेनॉल उत्पादनाचे हब; मंत्री नितीन गडकरींची माहिती

त्यानंतर सायंकाळी सहाच्यादरम्यान महापालिका आयुक्त दिवटे व प्रांताधिकारी चौगुले यांनी उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सुळकूड योजनेबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून बैठक घेण्याचे आश्वासनाचे लेखी पत्र देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. दरम्यान, खासदार धैर्यशील माने यांनीही बैठकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. त्यामुळे मार्चमध्ये बैठक घेण्यात येईल, अशी आशा कृती समितीचे समन्वयक प्रताप होगाडे यांनी व्यक्त केली. यावेळी सयाजी चव्हाण, विठ्ठल चोपडे, पुंडलिक जाधव, सदा मलाबादे, सुनील बारवाडे, नितीन जांभळे उपस्थित होते.

Sulkud Water Scheme
वाढीव उसाच्या एफआरपीचे कारखान्यांसमोर आव्हान; साखरेचे दर पाच वर्षांपासून स्थिर, 5 वर्षांत 750 रुपयांची झाली वाढ

पालकमंत्र्यांनी साधला संवाद

सुळकूड योजना कृती समितीने आंदोलन स्थगित करण्यासाठी बैठकीची ठोस तारीख देण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे आंदोलन स्थगितीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दूरध्वनीवरून संवाद साधून आंदोलकांना बैठकीचे आश्वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com