Gadge Baba Abhiyan
Gadge Baba Abhiyanesakal

तासात दीड टन प्लास्टिक कचरा संकलित; 'मी गाडगेबाबा.. मिशन स्वच्छ' अभियानाला कोल्हापूरकरांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद

शहर प्लास्टिक (Plastic) कचरामुक्त करण्याची प्रतिज्ञाही घेण्यात आली. संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अभियान झाले.
Summary

सलग एक तास दिलेल्या नियोजनानुसार प्लास्टिक कचऱ्याचे संकलन झाले आणि चाळीस कचरा संकलन केंद्रांवर ते एकत्रित करून प्रक्रियेसाठी महापालिकेच्या यंत्रणेकडे सुपूर्द करण्यात आले.

कोल्हापूर : ‘आम्ही सारे गाडगेबाबा’ (Gadge Baba Abhiyan) अशी साद घालत काल सकाळी हजारो कोल्हापूरकर एकवटले आणि त्यांनी एका तासात तब्बल दीड टन प्लास्टिक कचरा संकलित केला. हा संकलित कचरा नियोजनबद्धपणे महापालिकेच्या यंत्रणेच्या माध्यमातून प्रक्रियेसाठी एकत्रित करण्यात आला. निमित्त होते, कोल्हापूर अर्थ वॉरियर्स, कोल्हापूर महापालिका (Kolhapur Municipality) आणि सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित ‘मी गाडगेबाबा : मिशन स्वच्छ कोल्हापूर’ अभियानाचे.

यानिमित्ताने शहर प्लास्टिक (Plastic) कचरामुक्त करण्याची प्रतिज्ञाही घेण्यात आली. संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त अभियान झाले. रेडिओ सिटी रेडिओ तर ‘आम्ही कोल्हापुरी’ फेसबुक ग्रुप सोशल मीडिया पार्टनर होते. गेले आठवडाभर अभियानाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. साहजिकच शहरातील नऊही प्रमुख मार्गांवर सकाळी साडेसहापासूनच कोल्हापूरकर सहकुटुंब येऊ लागले. हॅन्डग्लोज, मास्क अशी सुरक्षिततेची सर्व साधने येथे उपलब्ध होती.

Gadge Baba Abhiyan
दख्खनचा राजा जोतिबा देवाची 'या' महिन्यात चैत्र यात्रा; तहसीलदारांनी शासकीय यंत्रणेचा घेतला आढावा

बरोबर सातच्या सुमारास ‘’साथी हात बढाना’’ अशी एकमेकांना साथ घालत सर्वत्र स्वच्छता मोहिमेला प्रारंभ झाला. याचदरम्यान ऐतिहासिक बिंदू चौकात मान्यवरांच्या उपस्थितीत अभियानाचे प्रातिनिधिक उद्‍घाटन झाले. सलग एक तास दिलेल्या नियोजनानुसार प्लास्टिक कचऱ्याचे संकलन झाले आणि चाळीस कचरा संकलन केंद्रांवर ते एकत्रित करून प्रक्रियेसाठी महापालिकेच्या यंत्रणेकडे सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर शहर प्लास्टिक कचरामुक्त करण्याची प्रतिज्ञा सर्वच केंद्रांवर झाली आणि अभियानाची सांगता झाली.

Gadge Baba Abhiyan
Koyna Dam : 1967 च्या भूकंपात कोयना धरणाला विशेष धोका का झाला नाही? काय आहे कारण?

यांचे विशेष सहकार्य...

कोल्हापूर अर्थ वॉरियर्ससह महापालिकेचे अभियानासाठी विशेष सहकार्य मिळाले. अर्थ वॉरियर्सचे जयश्री कटारिया, भरमा दिवटे, दीपक सावंत, कौस्तुभ जोशी, दीपक शिरोडकर, आशिष कोंगळेकर, स्नेहल कारेकर, सुहास बट्टेवार, तृप्ती देशपांडे, सुबोध भिंगार्डे, हेरंब परांजपे, अमोल पंढरपूरकर, प्रशांत निचिते, विशाल शिराळकर, योगेश कोडोलीकर, प्रिया मोहिते, राहुल चौधरी, अतुल पाटील, हेमलता बोरकर, तात्या गोवावाला, परितोष उरकुडे आदींनी प्रत्येक मार्गावरील संकलन केंद्रावर नेटके नियोजन केले. दरम्यान, गोकुळ दूध संघ, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल, विजय मेनन, स. म. लोहिया ग्रुप, मॉर्निंग मंत्रा फौंडेशन यांचेही सहकार्य मिळाले.

Gadge Baba Abhiyan
उमेदवारी मिळाली तर आनंदच, पण अजून ऑफर नाही; लोकसभा निवडणुकीबाबत शाहू छत्रपती महाराजांचं सूचक विधान

असे झाले अभियान

  • - संकलित सिंगल युज प्लास्टिक : १.५ टन

  • - एकूण सहभागी कोल्हापूरकर : ३,२७५

  • - एकूण सहभागी संस्था, संघटना : ७५

  • - संकलित मऊ प्लास्टिक : १०० किलो

  • - संकलित गुटखा, चॉकलेट रॅपर्स : ८० किलो

  • - संकलित प्लास्टिक बाटल्या : ५० किलो

  • - एकूण सहभागी महाविद्यालये : १०

  • - सहभागी विद्यार्थी संख्या : ५००

  • - सहभागी महापालिका कर्मचारी : ३७५

  • - एकूण टिप्पर : ३०

  • - एकूण ट्रॅक्टर ः १०

  • - कचरा संकलन केंद्रे : ४०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com