
Pune-Bangalore National Highway : शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात सोमवारी (ता.१) होणाऱ्या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे करण्यात आले आहे.