
पती, पत्नीने २५ लाखांना गंडवलं
esakal
ठळक मुद्दे (Highlights):
भिशीच्या नावाखाली फसवणूक: राजेंद्रनगरातील म्हाडा कॉलनीचे चेअरमन भिकाजी शिंदे व त्याची पत्नी प्राजक्ता यांनी ४० महिलांची तब्बल २५ लाख रुपयांची फसवणूक केली.
जादा व्याजदराचे आमिष: १५% परताव्याचे आमिष दाखवून महिलांकडून रक्कम उभी केली; परंतु पैसे परत न करता दांपत्याने पोबारा केला.
गुन्हा दाखल: आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासानंतर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला गेला; ४० हून अधिक महिलांचे जबाब नोंदवले.
Scam News Kolhapur : जादा व्याजदराच्या आमिषाने राजेंद्रनगरातील ४० महिलांची २५ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भिकाजी पंडित शिंदे व प्राजक्ता भिकाजी शिंदे (रा. म्हाडा कॉलनी, राजेंद्रनगर) या दांपत्याविरोधात गुन्हा दाखल आहे. याबाबत राजन आप्पासाहेब थोरवत यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.भिशीच्या नावाने जमवलेली रक्कम घेऊन दांपत्याने पोबारा केला आहे.