कोल्हापूर : गव्याच्या हल्यात दोन विद्यार्थींनी जखमी

सोहाळेतील ग्रामस्थामध्ये दहशतीच्या छायेखाली
शर्वरी सुनिल कोंडुसकर
शर्वरी सुनिल कोंडुसकरsakal

आजरा: सोहाळे (ता. आजरा) येथे बिथरलेल्या गव्याच्या हल्यात दोन महाविद्यालयीन विद्यार्थींनी जखमी झाल्या आहेत. आज शुक्रवार (ता.25) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. शर्वरी सुनिल कोंडुसकर व सानिका मारुती कोंडुसकर (दोघींचे वय 18) रा. सोहाळे तर्फे बाची या जखमी झाल्या असून त्यांच्यावर आजरा ग्रा्मिण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. काल गुरुवार (ता. 24) कोल्हाच्या हल्यात दोघे जण जखमी झाले होते. त्यानंतर दुसऱ्यादिवशीच गव्याचा हल्ला झाल्याने ग्रामस्थ दहशतीच्या छायेखाली आहेत.

शर्वरी सुनिल कोंडुसकर
Kolhapur : नदी प्रदूषण थांबवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी दिल्या 'या' सूचना

आज दुपारी महाविद्याल सुटल्यानंतर शर्वरी, सानिका व स्नेहल सतिश कोंडुसकर या तिघी जणी गावी परतत होत्या. सोहाळे फाट्यावरून चालत त्या येत असतांना मारुती कळेकर यांच्या रांगी नावाच्या शेता जवळ गवतात पहुडलेला गवा अचानक बाहेर रस्त्यावर आला. त्याला पहाताच तिघींची तारांबळ उडाली. त्या भितीने रस्त्यावरून गावच्या दिशेला पळत सुटल्या. गव्याचा धक्का बसल्याने शर्वरी रस्त्यावर कोसळली. तिच्या मानेला जबर मार बसला आहे. यामध्ये सानिकाही किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान रस्तावरून ये- जा करणाऱ्या नागरीकांनी त्यांना ग्रामिण रुग्णालयाकडे उपचारासाठी तातडीने हलवले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनेची माहीती मिळतात रुग्णालायत त्यांची विचारपुस केली. या घटनेमुळे सोहाळे परिसरात वन्यप्राण्यांची दहशत पसरली आहे. ग्रामस्थ भितीच्या छायेखाली आहेत.

शर्वरी सुनिल कोंडुसकर
Kolhapur: महापालिका गाडीच्या धडकेत 4 वर्षाची चिमुरडी जागीच ठार

सलग दुसरी घटना

गुरुवारी कोल्हाच्या हल्यात सुप्रिया राजेंद्र देसाई व शामराव भाऊ देसाई हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर आज गव्याने हल्ला केल्याने या परिसरात भितीची वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com