Uddhav Thackeray : ‘घर तिथे शिवसैनिक’ अभियान राबवा : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे; जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी मुंबईत संवाद

Kolhapur News : उद्या येणाऱ्या निवडणुका जिंकायच्याच या ईर्षेने आपण लढवून पुन्हा एकदा या राज्यावर व कोल्हापूरवर शिवसेनेचाच भगवा असेल, असे काम कोल्हापुरातील नागरिकांच्या मदतीने सर्व शिवसैनिक बंधू-भगिनींनी मेहनतीने करावे.’
Uddhav Thackeray interacting with Shiv Sena’s district-level leaders in Mumbai, calls for ‘Ghar Tithe Shiv Sainik’ campaign.
Uddhav Thackeray interacting with Shiv Sena’s district-level leaders in Mumbai, calls for ‘Ghar Tithe Shiv Sainik’ campaign.Sakal
Updated on

कोल्हापूर : ‘गाव तिथे शिवसेनेची शाखा आणि घर तिथे शिवसैनिक’ अभियान जिल्हाभर राबवा,’ असे आवाहन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ठाकरे यांनी आज मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी, कामगार, महिलांचे प्रश्‍न हाती घ्या. शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी करा. प्रत्येक गावांत गटप्रमुखांची नियुक्ती करून जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका व नगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागा.’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com