
अमित शाहांच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील कोल्हापुरात असणार आहेत.
Political News : अमित शाहांची कोल्हापुरात आज महत्वाची बैठक; मंत्रिमंडळ विस्तारावर होणार चर्चा?
Maharashtra Politics : बहुमताच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा शिंदे गट हीच खरी शिवसेना (Shivsena) असल्याचा निकाल शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगानं (Election Commission) दिला.
यासोबतच निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला (Shinde Group) दिलं आहे, त्यामुळं उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
त्यातच निवडणूक आयोगानं केंद्राच्या दबावाखाली हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. आयोगानं निकाल देताच राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज (19 फेब्रुवारी) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यामुळं राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
अमित शाहांच्या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील कोल्हापुरात असणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विस्तार करण्याकडं शिंदे-फडणवीस सरकारचा विचार असल्याचं सूत्रांकडून माहिती प्राप्त झालीये.
त्यामुळं अमित शाहांच्या कोल्हापूर दौऱ्यामध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तार प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित असल्यामुळं शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता पसरलीये. त्यातच निवडणूक आयोगाच्या निर्णयानं शिंदे गटामध्ये उत्साह संचारला असून मंत्रिमंडळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज कोल्हापुरात अमित शाह बैठक घेणार असल्याचं बोललं जात आहे.