
कोल्हापूर : जिल्ह्यातील विविध प्रेक्षणीय स्थळांना हजारो पर्यटक नित्य भेट देतात, नयन मनोहरीदृश्य पाहून निघून जातात, अशा पर्यटकांना त्या-त्या पर्यटन स्थळांची गुणवैशिष्ट्ये समजून घेता यावीत, पर्यटनस्थळांची महती सुर्व दूर पोहोचावी त्यासोबत स्थानिकांना रोजगारही मिळावा, अशा बहुउद्देशाने गाईड तयार करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पुढाकार घेतला असून, गावातील तरुणांना गाईड प्रशिक्षण देण्यात येणार आहे.