Mahadavi Elephant Viral Video : माधुरी म्हणजेच महादेवी हत्तीणीच्या पायाला जखम झाली असून कोल्हापुरातील नांदणी गावातून महादेवीला गुजरातच्या वनतारामध्ये (Vanatara Gujarat) नेल्यानंतर तेथील माहुताने हत्तीणीला मार्गस्थ करण्यासाठी तिला चिमटे काढल्याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यामुळे 'वनतारा'मध्ये खरंच महादेवीची काळजी घेतली जातेय का? तिला कोणता त्रास दिला जातोय का? ती 'वनतारा'मध्ये सुरक्षित राहिल का?, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होताना दिसत आहे.