स्वच्छतेच्या दूताला केला सलाम ; कोण तो वाचा

vulture is the messenger of cleanliness today's vulture day is celebrated on online
vulture is the messenger of cleanliness today's vulture day is celebrated on online
Updated on

राशिवडे (कोल्हापूर)  : पर्यावरणातील स्वच्छता दूत म्हणजे गिधाड. गिधाडाची बहुतेकांना किळस वाटते. मेलेले प्राणी खाणारा पक्षी यापलीकडे त्यांच्याबद्दल कोणी फारशी उत्सुकता दाखवत नाही. सध्या दुर्मिळ होत असलेल्या या पक्षाचा आंतरराष्ट्रीय जागरुकता दिन आज ऑनलाइन साजरा झाला. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयांनी यात सहभाग घेतला.

मेलेले प्राणी लगेचच खाऊन उपजीवीका करणारी गिधाडे संभाव्य रोगराईच्या प्रसाराला अटकाव करत असतात. दहावीस वर्षापूर्वी वस्तीपासून दूर गेले कि, गिधाडे सर्वत्र दिसत होती. पण आता मात्र त्यांना शोधावे लागते. मात्र गिधाडांच्या संरक्षणाकडे पूर्ण जगभर गंभीरपणे पाहिले जात आहे. मानवाचे अधिवासावरील अतिक्रमण हे अनेक सजीवांच्या नाशाला कारणीभूत ठरले आहे. हे आपण वारंवार अनभुवतो. शिवाय पाण्यात मिसळणारी कीटकनाशके, औद्योगिक प्रदूषण आदींमुळेही गिधाडांच्या जीवनावर परिणाम होत आहे. यामुळे कमी अधिक प्रमाणात काही गिधाडांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे सर्वच जीवचक्रांचे आणि साखळ्यांचे संतुलन बिघडते आहे. गिधाडे अत्यंत कार्यक्षमतेने सफाई करत असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांचे फार महत्त्व आहे. भारतात ६ प्रकारची गिधाडे आढळतात मात्र त्यापैकी पांढऱ्या पाठीची आणि लांब चोचवाली गिधाडे अगदीच कमी संख्येने राहिली आहेत.

राज्य सरकार आणि केंद्र सरकार तसेच वनविभागाकडून करण्यात येणाऱ्या विविध गिधाड संवर्धनाचे उदाहरण देताना सह्याद्री प्रकल्पाचे क्षेत्र संचालक समाधान चव्हाण यांनी महाराष्ट्र सरकारकडून नारळ उत्पादकांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईचा उल्लेख केला. तसेच त्यांनी "व्हल्चर रेस्टोरंट" या उल्लेखनीय प्रयोगाची प्रशंसा केली. निसर्ग, प्राणी, पक्षी नामशेष होण्यास वेळ लागणार नाही असेही त्यांनी अधोरिखित केले. व्याख्यानानंतर प्रश्नमंजुषा आणि  गिधाड विषयी जनजागृतीची फिल्म दाखवण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन रमण कुलकर्णी, अमोल कुलकर्णी, राजू सावंत, अविनाश पवार यांनी केले.

"गिधाडाचे पर्यावरण स्वच्छतेच्या दृष्टिने फार महत्व आहे. त्यांच्या वसाहती नामशेष होत आहेत. माणसाचे निसर्गचक्रावरील आक्रमण हे कारण ठरत आहे. हा स्वच्छता दूत वाचला पाहिजे."

-समाधान चव्हाण, क्षेत्र संचालक सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com