कबनूर नगरपरिषद झाली तर मिळणार हे लाभ 

कबनूर नगरपरिषद झाली तर मिळणार हे लाभ 

कबनूर : कबनूर नगरपरिषद व्हावी यासाठी अनेक वर्षापासून नागरिकांची मागणी आहे. कबनूरमधील वाढते उद्योग, व्यवसाय व लोकवस्ती यांचा विचार करता गावाला नागरी सुविधांबरोबरच इतर सुविधा पुरवण्यामध्ये ग्रामपंचायतला मर्यादा पडत आहे. त्यामुळेच ग्रामपंचायतीचा घर व पाणीपट्टी यांच्या वसुलीवरही परिणाम होत आहे. ग्रामपंचायतीची थकबाकी कोट्यावधी रुपयांची आहे. 

गावविकास आराखडा वाढीव वस्त्यांमुळे सुनियोजित करणे ग्रामपंचायतीच्या आवाक्‍याबाहेर आहे. त्याचबरोबर घनकचरा उठाव, कचऱ्याची विल्हेवाट लावणे अशक्‍य होत आहे. गावात खेळासाठी मैदान, बागबगीचा, दर्जेदार रस्ते, गटारी, लाईट, मोफत शासकीय रुग्णालय, बांधकाम परवाना एकाच छताखाली, झोपडपट्टी सुधारणा, स्वच्छ शौचालय महिला लघुउद्योगांसाठी योग्य प्रशिक्षण, ड्रेनेजची सुविधा, वाहतुकीचे योग्य नियोजन, पोलिस स्टेशन, गरीब विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण, शासकीय व्यायामशाळा, चांगल्या पद्धतीची स्मशानभूमी आदी सुविधा नगरपरिषद झाल्यानंतर होऊ शकतात. शहरी भागात पंतप्रधान आवास योजनेसाठी बॅंकांद्वारे बारा लाखांपर्यंत सहा टक्‍के व्याजदराने कर्जपुरवठा होऊ शकतो. 

नगरपालिका झाल्यास मुख्याधिकारी, अभियंता, पाणी पुरवठा अभियंता, आरोग्य अधिकारी, लेखा परीक्षक, शिक्षण अधिकारी यासह विविध अधिकारी मिळतात. पाणी पुरवठा, जलविकास, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, बॉम्बे टाऊन प्लॅनिंग ऍक्‍ट अन्वये नगरपालिकांनी अंगिकारलेल्या विकास योजना व नगररचना योजना नगरपालिकेचा अधिकारी व सेवक यांचा महागाई भत्ता अधिकाऱ्यांचे सामान्यत संवर्ग स्थापन झाले तर, त्यातील अधिकाऱ्यांचा पगार सार्वजनिक आरोग्य, अग्निशमन व्यवस्था, रस्ते बांधणी व दुरुस्ती, राज्य सरकार वेळोवेळी ठरवेल त्या सोयी सुविधा मिळतात.

ग्रामसभेतही नगरपरिषदेचा ठराव 
माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत कबनूरमार्फत कबनूर नगरपरिषद होण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता तहसिलदार, हातकणंगले यांच्याकडे 4 जानेवारी 2019 रोजी दिलेल्या आहेत. नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामसभेत ग्रामस्थांनी कबनूरला नगरपरिषद व्हावी यासंदर्भात सर्वानुमते ठराव केलेला आहे. सोयीस्कर बाबी पूर्ण झाल्या असताना आता शासनाने याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com