गंगावेश तालमीची आणि लाल मातीची अब्रू घालवली; सिकंदरच्या अटकेनंतर वस्ताद संतापले

Sikandar Shaikh : कुस्तीपट्टू सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केलीय. त्याचा पपला गुर्जर गँगशी संबंध असल्याचं पोलिसांनी म्हटलंय. या घटनेमुळे कुस्तीक्षेत्रात खळबळ उडाली आहे.
Punjab Police Arrest Wrestler Sikandar Shaikh Over Papla Gujjar Gang Links

Punjab Police Arrest Wrestler Sikandar Shaikh Over Papla Gujjar Gang Links

Esakal

Updated on

पैलवान सिकंदर शेख याला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी पंजाब पोलिसांनी अटक केल्यानं खळबळ उडालीय. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सिकंदर शेखनं प्रतिनिधित्व केलंय. महाराष्ट्र केसरीची मानाची गदाही त्यानं पटकावलीय. या पार्श्वभूमीवर त्याच्यावर झालेले आरोप अत्यंत गंभीर अशा स्वरुपाचे आहेत. कुटुंबियांनी सिकंदर शेखला गोवण्याचा हा कट असल्याचं म्हटलंय. पंजाब पोलिसांनी सिकंदर शेखला अटक केल्यानंतर त्याचे राजस्थानमधील पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचं सांगितलंय. त्याला याच प्रकरणी रंगेहाथ पकडल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com