
"Violence in Top village: Youth assaulted as old Ganesh visarjan dispute resurfaces."
Sakal
नागाव : टोप (ता. हातकणंगले) येथे जुन्या वादातून एकावर लोखंडी रॉड व फरशीने डोक्यात वार केला. विनय जयसिंग पाटील (वय २०, रा. टोप) असे त्याचे नाव आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीतील एक वर्षापूर्वीचा वाद यंदा पुन्हा गणेश विसर्जन मिरवणुकीतच उफाळून आला. ही घटना शुक्रवारी (ता. ५) टोप येथील गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी घडली.