पाटण (जि.सातारा) : बिबट्या पून्हा आला... अन्

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

ऊस तोडणी मजूरांबरोबर शेळ्या असल्याने बिबट्या शेळ्यांच्या शोधात आला असावा मात्र दबा धरून बसलेल्या बिबट्याने लघुशंकेसाठी गेलेल्या महिलेवर च हल्ला केला अशी शक्यता वन क्षेत्रपाल विलास काळे यांनी सांगितले.

पाटण (जि. सातारा) : ऊस तोडणी मजूर महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाल्याची घटना नावडी ता. पाटण येथे घडली असून जखमी महिलेस कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा -  शिक्षक कंटाळले गटबाजीला ; लढाई सुरुच ठेवणार

याबाबत वन विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, नावडी गावात ऊस तोडणीचे काम सुरू आहे. अनेक साखर कारखान्याचे ऊस तोडणी मजूर आलेले आहेत. 

शिवारात ऊस तोडणी मजूर महिला लघुशंकेसाठी विट भट्टीच्या आडोश्याला गेली असता  बिबट्याने सदर महिलेवर अचानक हल्ला केला.
 
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे महिलेने आरडाओरडा केला. इतर सहकारी धावून आल्यामुळे बिबट्या पसार झाला. जखमी महिलेस उपजिल्हा रुग्णालय कराड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ऊस तोडणी मजूरांबरोबर शेळ्या असल्याने बिबट्या शेळ्यांच्या शोधात आला असावा मात्र दबा धरून बसलेल्या बिबट्या ने लघुशंकेसाठी गेलेल्या महिलेवर च हल्ला केला अशी शक्यता वन क्षेत्रपाल विलास काळे यांनी सांगितले.

नक्की वाचा -  हे केल्याशिवाय शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard Attack Women In Patan District Satara