Nipani : दिपोत्सवामुळे उजळून निघाले महादेव मंदिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nipani : दिपोत्सवामुळे उजळून निघाले महादेव मंदिर

Nipani : दिपोत्सवामुळे उजळून निघाले महादेव मंदिर

निपाणी : तीनशेहून अधिक किलो रांगोळी, १० हजार १ दिवे, भव्य आकाराच्या आकर्षक रांगोळ्या, भाविकांचा उत्साह, मंदिर परिसरात केलेली आकर्षक विद्युत रोषणाई अशा वातावरणात निपाणीतील महादेव गल्लीतील महादेव मंदिरासह सांस्कृतिक भवन शुक्रवारी (ता. १९) सायंकाळी दीपोत्सवांनी उजळून गेले. यंदा मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ फिरते स्टॅन्ड लावून काचेच्या ग्लासमध्ये पाणी आणि तेल घालून दिवे प्रज्वलित केले होते. आकर्षक रांगोळी व त्यामध्ये महादेवाची पिंडी रेखाटली होती. या कलेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रात्री उशिरापर्यंत दीपोत्सवासह कार्तिकस्वामींच्या दर्शनासाठी गर्दी झाली होती.

हेही वाचा: पदार्पणाच्या सामन्यात हर्षलची हवा; टीम इंडियासमोर 154 धावांचे आव्हान

महादेव मंदिरात आयोजित कार्तिक दीपोत्सवात माजी आमदार काकासाहेब पाटील, हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, केएलई संस्थेचे संचालक कमर बागेवाडी, मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी, माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार व मान्यवरांच्या हस्ते कार्तिकस्वामी मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलन झाले. महादेव मंदिर सांस्कृतिक भवनात चिक्कोडीच्या राजू नेर्ली आणि संतोष यमकनमर्डी यांनी यांनी तब्बल तीनशे किलोपेक्षा जास्त रांगोळी यांचा वापर करून तब्बल सहा तासात विविध प्रकारच्या आकर्षक डोळ्यात भरणाऱ्या रांगोळ्या काढल्या होत्या.

कार्यक्रमास हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, संचालक पप्पू पाटील, व्हीएसएमचे संचालक संजय मोळवाडे, कमिटी अध्यक्ष प्रवीण बागेवाडी, डॉ. महेश ऐनापुरे, वज्रकांत सदलगे, रवींद्र शेट्टी, गजानन वसेदार, पप्पू दुमाले, शैलेश बेळगली, रावसाहेब वसेदार, विजय चंद्रकुडे, विलास शिंदे, रोहित पाटील, सोमशेखर कोठीवाले राजशेखर कोठीवाले, प्रथमेश चंद्रकुडे, सागर वालीकर, अमोल चंद्रकुडे, निखिल चंद्रकुडे, आकाश भोपळे, राहुल चंद्रकुडे, श्रीनिवास गोंधळी, सूरज कट्टीमनी, राहुल चौगुले, बंडा जलपुरे, पंकज जाधव, विशाल ढोणे, माजी रवींद्र नगरसेवक रवींद्र चंद्रकुडे, रवींद्र शेट्टी, बाबासाहेब चंद्रकुडे, अप्पासाहेब आडीपवाडे, मल्लिकार्जुन गडकरी, दयानंद कोठीवाले, रवींद्र कोठीवाले, समीर बागेवाडी, महेश दुमाले, एम. पी. पाटील, चंद्रकांत चौगुले, कल्लाप्पा खोत, अण्णासाहेब जाधव, विजय दुमाले, दयानंद कोठीवाले, बाबासाहेब साजन्नावर यांच्यासह भाविक उपस्थित होते. यावेळी प्रसादाचे वाटप झाले.

रांगोळीत मूर्तींची सजावट

महादेव मंदिर सांस्कृतिक भावनांमध्ये विविध प्रकारच्या आकर्षक मोठ्या रांगोळ्या रेखाटल्या होत्या. त्यामध्ये महादेवाचा नंदी, शंकराची मूर्ती साकारण्यात आली होती. त्यामुळे दीपोत्सव अधिकच खुलून दिसत होता.

हेही वाचा: गुगलचे CEO पिचाई यांचा AB साठी 'सुंदर' मॅसेज

रांगोळीत मूर्तींची सजावट

महादेव मंदिर सांस्कृतिक भावनांमध्ये विविध प्रकारच्या आकर्षक मोठ्या रांगोळ्या रेखाटल्या होत्या. त्यामध्ये महादेवाचा नंदी, शंकराची मूर्ती साकारण्यात आली होती. त्यामुळे दीपोत्सव अधिकच खुलून दिसत होता.

loading image
go to top