

BJP Clinches Atpadi Nagar Panchayat President Post
Esakal
Atpadi Nagar Palika Election Result : सांगलीतील आटपाडी नगरपंचायतीत शिवसेनेनं सर्वाधिक जागा जिंकल्या. मात्र नगराध्यक्षपदी भाजपच्या उत्तम जाधव यांनी बाजी मारली. आटपाडी आमदार सुहास बाबर यांच्या मतदारसंघातील आटपाडी नगरपंचायतीवर नगराध्यक्षपदाचे उमेदवार उत्तम जाधव यांच्या रूपाने भाजपाने झेंडा फडकवला आहे. त्यांचा 1154 मतांनी विजयी झाला तर शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले. भाजपाचे सात, राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि तीर्थक्षेत्र संयुक्त आघाडीचा एक नगरसेवक निवडून आला.