...यामुळेच मी आता आमदारही; चंद्रकांत जाधव यांची प्रतिक्रिया

MLA Chandrakant Jadahav  Comment After Victory In Assembly Election
MLA Chandrakant Jadahav Comment After Victory In Assembly Election

कोल्हापूर - मी माझ्या कारखान्यात वेळप्रसंगी कामगार म्हणून राबलो. सर्वांना सामावून घेणारा एक व्यवस्थापक म्हणून काम करीत राहिलो. कारखाना एके कारखाना असे न करता गल्लीतल्या टेंबलाई जत्रेपासून ते खचाखच भरलेल्या शाहू स्टेडियमवर फुटबॉलच्या थरारात सहभागी होत, घामाने चिंब भिजून गेलो. अर्थातच, माझ्या या अस्सल कोल्हापुरी बाण्यामुळेच मी आता आमदारही झालो. अशा साध्या सोप्या शब्दांत कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांनी आपल्या विजयाबद्दलची प्रतिक्रिया ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. 

दृष्टिक्षेप

  • चंद्रकांत जाधव यांचा आवडता खेळ फुटबाॅल
  • नुतन आमदारांच्या घरात उद्योगाची परंपरा
  • पत्नी कोल्हापूर महापालिकेत भाजपच्या नगरसेविका

चंद्रकांत जाधव यांना घरात उद्योगाची परंपरा असल्याने ते सहजपणे उद्योगातल्या खाचाखोचा जाणून घेऊ लागले. आवडता खेळ फुटबॉल. त्यामुळे आयटीयआयच्या राज्य फुटबॉल स्पर्धेतही खेळू लागले. आयटीआय राज्याच्या फुटबॉल स्पर्धेतला हुकमी एक्काही ठरले. त्यांच्या फुटबॉल खेळाची बालवाडीच असलेल्या पाटाकडील तालीम संघाकडून ते खेळू लागले. आणि तरुणाईतला एक दमदार फुटबॉल हिरो ठरले. त्यांच्या जाधव इंडस्ट्रीमध्ये ते ‘ऑल इन वन’ होते.

महापालिकेच्या निवडणुकीत ते थेट उतरले नाहीत. १९८५ मध्ये त्यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली; पण त्यांना ऐनवेळी बाजूला केले गेले. भाऊ संभाजी जाधव यांना त्यांनी तीन वेळा निवडून आणले.

भाजपच्या तिकिटावर पत्नी आणि भावालाही निवडून आणले. विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसने आग्रह करून उमेदवारी दिली. आणि वीस दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या चंद्रकांत जाधवांनी त्यांच्या पस्तीस-चाळीस वर्षांच्या नात्या-गोत्याची, पै-पाहुण्यांची, मित्र परिवाराची मदत घेत प्रचारात उडी घेतली आणि थेट विजयालाच गवसणी घातली. 

मी शहराच्या पायाभूत सुविधा, अंबाबाई मंदिर, विमानतळ, उद्योग, थेट पाईपलाईन, पर्यटन, खेळ व शहराचे आरोग्य यावर भर देणार आणि नेमके काय करायचे हे अभ्यास करूनच ठरविणार आहे.  
- चंद्रकांत जाधव,
आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com