esakal | माझ्या सेक्यूरिटीचा ताण पोलिसांवर नको, मंत्र्याने केली सुरक्षा परत
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Shankarrao Gadakh Ahmadanagar News

कोरोना प्रादूर्भाव रोखताना सरकारी यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. सर्वात त्रास पोलिस व वैद्यकीय यंत्रणेला होत आहे. चोवीस तास ते डोळ्यात तेल घालून काम करीत आहेत. या पार्श्वभूमीवर आता नगर एका मंत्र्याने आपल्याकडील पोलिस यंत्रणा स्वतःहून नाकारली आहे. त्यांनी स्वतःहून तसे पोलीस अधीक्षकांना पत्र दिले आहे. सुरक्षेसाठी दिलेले पोलीस कर्मचारी व वाहनही वापस करण्याची विनंती केली आहे.

माझ्या सेक्यूरिटीचा ताण पोलिसांवर नको, मंत्र्याने केली सुरक्षा परत

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नगर : कोरोना प्रादूर्भाव रोखताना सरकारी यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. सर्वात त्रास पोलिस व वैद्यकीय यंत्रणेला होत आहे. चोवीस तास ते डोळ्यात तेल घालून काम करीत आहेत. या पार्श्वभूमीवर आता नगर एका मंत्र्याने आपल्याकडील पोलिस यंत्रणा स्वतःहून नाकारली आहे. त्यांनी स्वतःहून तसे पोलीस अधीक्षकांना पत्र दिले आहे. सुरक्षेसाठी दिलेले पोलीस कर्मचारी व वाहनही वापस करण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा- कोरोनाच्या नावाखाली काळाबाजार ः टोमॅटाेचे रुपया किलाेने लिलाव... शेतकऱ्यांची लूट आणि ग्राहकांची फसवणूक

मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी पत्रात लिहले आहे,देश आणि महाराष्ट्र कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रात राष्ट्रहितासाठी संचारबंदी लागु केली आहे. याचे काटेकोरपणे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असुन आपल्या भागातील संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी संपुर्ण पोलीस यंत्रणा आटोकाट प्रयत् करत आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर आलेला अधिकचा ताण पाहता मंत्री म्हणून माझ्या (Spotting) सुरक्षेसाठी असलेले पोलीस कर्मचारी व ते वापरत असलेले पोलिस वाहन आपण शहर व परिसरातील संचारबंदीच्या अमलबजावणीसाठी वापरण्यास माझी काहीही हरकत नाही.

क्लिक करा- तिसऱ्या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाच्या संपर्कातील लोकांची तपासणी

आज रोजी माझ्या सुरक्षेपेक्षा देशाची तसेच महाराष्ट्राची व येथील जनतेची सुरक्षा महत्वाची आहे. महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे ते कर्तव्य आहे. करिता मी आजपासून माझे सुरक्षेसाठी असलेले पोलिस कर्मचारी व ते वापरत असलेले पोलिस वाहन कोरोना व्हायरस प्रार्दुभाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनेत वापरण्यास आपणास याद्वारे परवानगी देत असल्याचेही त्यांनी पोलीस अधीक्षक यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

गडाख घराण्याचा वारसा

कोणत्याही आपत्तीच्या काळात गडाख घराण्याने समाजासाठी आपली तिजोरी रिकामी केली आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यापासून हा वारसा चालत आला आहे. तो मंत्री शंकरराव व प्रशांत पाटील गडाख हे दोघे बंधू ते नेटाने चालवत आहेत. कोल्हापूरमधील पूरस्थिती असो नाही तर भूकंपामुळे विस्कळीत झालेले जनजीवन असो. कोणत्याही राष्ट्रीय आपत्तीत हे कुटुंब पुढे सरसावल्याचे उदाहरण आहे. सैनिकांवर झालेल्या हल्ल्यावेळीही प्रशांत पाटील गडाख मदतीसाठी पुढे आले होते. त्यांनी सैनिकांच्या कुटुंबांना लाखोंची मदत दिली होती. आताच्या आपत्तीतही मंत्री गडाख यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.

हे वाचलंत का?कोरोनामुळे चारशे वर्षांत प्रथमच गुढीपाडव्याला शनिदेवाला गंगास्नान नाही