शिराळा नगराध्यक्षापदी राष्ट्रवादीच्या महिला उमेदवार

NCP's Female Candidate For Shirala Town President
NCP's Female Candidate For Shirala Town President

शिराळा( सांगली) : शिराळा नगरपंचायत नगराध्यक्षापदी राष्ट्रवादीच्या अर्चना शेटे तर उपनगराध्यक्षपदी किर्तीकुमार पाटील यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी काम पाहिले.

किर्तीकुमार पाटील यांची उपनगराध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली आहे. निवडी नंतर आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते नूतन नगराध्यक्षा अर्चना शेटे व उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील यांचा विजयराव नलवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

नगराध्यक्षापदी राष्ट्रवादीच्या महिला उमेदवार

नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के व उपनगराध्यक्ष किर्तीकुमार पाटील यांचा अडीच वर्षाचा कार्यकाल संपल्याने या पदासाठी निवडणूक लागली होती. राष्ट्रवादीच्या सुनीता निकम,प्रतिभा पवार व भाजपच्या राजश्री यादव यांनी माघार घेतल्याने अर्चना शेटे यांचा एकमेव अर्ज राहिला होता.

निवडणूक बिनविरोध झाली

नगराध्यक्षा पदासाठी अर्चना शेटे व उपनगराध्यक्ष पदासाठी किर्तीकुमार पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी नागेश पाटील यांनी केली.निवडीनंतर पाटील यांच्या हस्ते नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. 

उपस्थिती
मुख्याधिकारी कपिल जगताप, मावळत्या नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के, नगरसेवक गौतम पोटे, संजय हिरवडेकर, मोहन जिरंगे, विजय दळवी, नगरसेविका प्रतिभा पवार,  सुनीता निकम, आशाताई कांबळे, सुजाता इंगवले, राजश्री यादव, सीमा कदम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, प्राचार्या उज्वला पाटील, शिल्पा कुरणे, रुपाली भोसले,कल्पनागायकवाड, संगीत खटावकर, विश्वास कारखाना संचालक विश्वास कदम , माजी सरपंच देवेंद्र पाटील, राजू निकम, के वाय मुल्ला, सुनील कवठेकर, दस्तगिर पठाण, बाबा कदम,डी.जी.अत्तार उपस्थित होते

मतभेद विसरून  विकासाला चालना

विकासाला निधी कमी पडणार नाही राज्यात आपल्या विचाराचे महाघाडीचे सरकार असल्याने व मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे अर्थ खाते असल्याने शिराळच्या विकासाला नगरपंचयतच्या माध्यमातून निधीची कमतरता भासणार नाही. राजकीय मतभेद विसरून सर्व नगरसेवकांनी विकासाला चालना द्यावी.

आमदार  - मानसिंगराव नाईक

सर्वांना विश्वासात घेऊन विकासावर भर

आमदार मानसिंगराव नाईक यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी सर्वांना सोबत घेऊन पार पाडेल. नाट्यगृह, नगरपंचायतसाठी सुसज्ज इमारत ,छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न शिराळ्यात झाल्याने आठवण म्हणून त्यांचा अश्वरूड पुतळा उभारणे व तो इतिहासाची लोकांसमोर आणणे. याच बरोबर जास्ती जास्त इतर पायाभूत सुविधाच्या माध्यमातून विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील राहील.
नगराध्यक्षा -अर्चना शेटे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com