esakal | दोन घटनांचा झाला उलगडा: गजबरवाडीच्या चोरट्यांनी दिली कबुली
sakal

बोलून बातमी शोधा

Nipani confesses to stealing mobile phone from Gajbarwadi thief nipani marathi news

पोलिस तपासात ही माहिती उघड झाल्याने निपाणी शहर व ग्रामीण पोलिसांनी संबंधित दोन्ही महिलांकडून तक्रारी दाखल करून घेतल्या आहेत.

दोन घटनांचा झाला उलगडा: गजबरवाडीच्या चोरट्यांनी दिली कबुली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निपाणी : कोल्हापूर येथील राजारामपुरी पोलिसांनी अटक केलेल्या गजबरवाडीतील सराईत मोबाईल चोरट्यांकडून निपाणीतील दोन घटनांचा उलगडा झाला आहे. शहर व ग्रामीण पोलिसांनी या दोन्ही घटनांचा तपास चालवला आहे. सुमीत महादेव निकम (वय २५) असे चोरट्याचे नाव आहे. कोल्हापूर पोलिसांनी निकम याच्याकडून २ लाख ३६ हजार रुपये किंमतीचे १४ मोबाईल ३ एप्रिल रोजी जप्त करून त्याला अटक केली आहे.


सराईत चोरटा सुमीत निकम याने कोल्हापूर पोलिसांना आपण कोल्हापूर शहर व परिसरासह निपाणी, हुपरी, कणेरीवाडी, कागल, इचलकरंजी, गडहिंग्लज, संकेश्वर परिसरातून मोबाईल चोरीची कबुली दिली आहे. यामध्ये निपाणी येथील अनुराधा रवींद्र बोंगार्डे (रा. श्रीनगर, निपाणी) यांचा प्रतिभानगर येथून १३ जानेवारी तर सौंदलगा येथील अर्चना तानाजी भेंडुगळे यांचा १६ फेब्रुवारी रोजी सौंदलगा-कुर्ली पाणंद रस्त्यावरून चालत जाताना हातातील मोबाइल हिसडा मारून पोबारा केला होता. पोलिस तपासात ही माहिती उघड झाल्याने निपाणी शहर व ग्रामीण पोलिसांनी संबंधित दोन्ही महिलांकडून तक्रारी दाखल करून घेतल्या आहेत.

हेही वाचा- राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या कोगनोळीजवळ दुचाकी अपघातात वाळकीचा युवक जागीच ठार

हेही वाचा- रिक्षात बसताच क्षणी २२ रुपयांचे मीटर;  १ मेपासून होणार भाडेवाढ

संपादन- अर्चना बनगे

loading image