esakal | सार्वजनिक गणेशोत्सवावर 'खाकी'ची नजर! निपाणीत तीन अधिकाऱ्यांसह 56 पोलिस
sakal

बोलून बातमी शोधा

सार्वजनिक गणेशोत्सवावर 'खाकी'ची नजर! निपाणीत तीन अधिकाऱ्यांसह 56 पोलिस

गणेशोत्सव काळात तीन पोलिस अधिकारी, ५६ पोलिस कर्मचारी १८ होमगार्ड बंदोबस्ताकरिता तैनात केले आहेत. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावर 'खाकी'ची नजर राहणार आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवावर 'खाकी'ची नजर! निपाणीत तीन अधिकाऱ्यांसह 56 पोलिस

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

निपाणी (बेळगाव) : निपाणी मंडल पोलिस निरीक्षक कार्यक्षेत्रात यंदा 465 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गणेशोत्सव साजरा करण्याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी हे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आढावा घेत आहेत. गणेशोत्सव काळात तीन पोलिस अधिकारी, ५६ पोलिस कर्मचारी १८ होमगार्ड बंदोबस्ताकरिता तैनात केले आहेत. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावर 'खाकी'ची नजर राहणार आहे.

हेही वाचा: निपाणी : चोरीचे दागिने घेतल्याच्या संशयावरून व्यावसायिकांची चौकशी

सार्वजनिक मंडळांनी समाजोपयोगी उपक्रमावर भर द्यावा, साध्या पद्धतीने छोटा मंडप टाकून सार्वजनिक रहदारीस कुठल्याही प्रकारची अडचण होणार नाही, या पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मंडपाची निर्मिती करावी, याबाबतच्या सूचना पूर्वीच पोलिस प्रशासनाकडून मंडळांना दिल्या आहेत. त्याचे मंडळाकडून पालन होत आहे. शासनाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांप्रमाणे प्रत्यक्षात येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष द्यावे. दोन दिवसापासून शिवाजीनगरातील एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री मंडपात थांबणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया शहरवासीयातून व्यक्त होत आहेत.

हेही वाचा: निपाणी : दुचाकींच्या धडकेत एक ठार तीन जखमी

पोलिसांनाही सूचना

पोलिस कर्मचाऱ्यांना गणेशोत्सव काळात गणेश मंडपात अवैध धद्यांना प्रतिबंध घालण्यासह बऱ्याच दिवसापासून फरार आरोपीबाबत स्पेशल कारवाई करावी. विशेषतः शहरात चेनस्नेचिंग, छेडछाड होणार नाही, याकरिता साध्या पोशाखात काही पोलिस तैनात केले आहेत. बाजारपेठेसह मुख्य चौकात वाहतुकीचा अडथळा होऊ नये, याकरिताही पोलिस कर्मचारी तैनात केले आहेत. पोलिस व्हॅनमधून सतत पेट्रोलिंग केले जात आहे.

हेही वाचा: निपाणी - महापुरात स्थलांतरावेळी शेतकऱ्याचा बळी, अथणीतील घटना

'कायदा, सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून पोलिस प्रशासनाने काही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाया सुरू आहेत. गणेशोत्सव सणासुदीच्या काळात वीजपुरवठा खंडीत होऊ नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना बैठकीच्या माध्यमातून हेस्कॉमला दिल्या आहेत. गणेश मंडळांना समाजोपयोगी उपक्रमावर भर देण्याच्या सूचनाही केलेल्या आहेत.'

- संगमेश शिवयोगी, मंडल पोलिस निरीक्षक, निपाणी

loading image
go to top