निपाणी : 1 ऑक्टोबरपासून आयटीआय महाविद्यालये सुरु होणार

कर्नाटक शासनाचा आदेश : महाविद्यालयांमध्ये तयारी सुरु
निपाणी : 1 ऑक्टोबरपासून आयटीआय महाविद्यालये सुरु होणार
sakal

निपाणी : कर्नाटकात सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे शासनाने 1 आक्टोबरपासून आयटीआय महाविद्यालये सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर संबंधित महाविद्यालयातून तयारी सुरु झाली आहे. सध्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांची ये-जा वाढली झाली आहे.

निपाणी : 1 ऑक्टोबरपासून आयटीआय महाविद्यालये सुरु होणार
बोरी उमरगे पुलावर पाणी! शिरवळवाडी सांडव्याचा भराव गेला वाहून

शिक्षकही प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याच्या कामात व्यस्त आहेत. महाविद्यालय सुरु होताच 1 तारखेला प्रवेशांची अंतिम यादी जाहीर होणार आहे. तसेच 4 आक्टोबरपासून 2017 च्या आयटीआय अनुतीर्ण विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा होणार आहे. त्यामुळे शिक्षकांवर सुरुवातीपासूनच कामाचा ताण वाढणार आहे.

कोरोना, महापूर, अतिवृष्टीमुळे गेल्या दोन वर्षापासून बंद असलेली आयटीआय महाविद्यालये नियमित सुरु होणार असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा मिळाला आहे. ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम सुरु असला तरी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोबाईल रेंजची समस्या होती. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा लाभ झालेला नाही.

मोजक्याच विद्यार्थ्यानी ऑनलाईन अभ्यासक्रमाचा लाभ घेतला आहे. खेडेगावात सामान्य कुटुंबाकडे मोबाईल खरेदीची ऐपत नसल्याने तेही विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहिले आहेत. सर्व बाबींचा विचार करून कर्नाटक शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालकातून समाधान व्यक्त होत आहे.

`1 आक्टोबरपासून महाविद्यालये नियमित सुरु करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे त्याची तयारी सुरु झाली आहे. प्रवेश प्रक्रियेचे काम सुरु असून 30 तारखेला ते संपणार आहे. त्यानंतर नियमित महाविद्यालये सुरु होतील.`-अजित सातवर, प्रशिक्षक, सरकारी आयटीआय, निपाणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com