निपाणीचा रोहित कामत बनला लेफ्टनंट

गया येथे घेतली शपथ : शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा
निपाणीचा रोहित कामत बनला लेफ्टनंट

निपाणी : गरिबीची जाण, आई-वडिलांचे कष्ट आणि गुरुवर्यांच्या मागदर्शनानुसार जिद्द व चिकाटीच्या जोरावर भारतीय सैन्यात चमकदार कामगिरी करण्याचे स्वप्न पूर्ण केलेल्या रोहित प्रदीप कामत याची लेफ्टनंटपदी निवड झाली आहे. येथील साखरवाडी हौसाबाई कॉलनीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या रोहित याच्या या यशामुळे निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. बिहारमधील गया येथील ऑफिसर ट्रेनिंग अॅकॅडमी येथे शनिवार (ता. ११) झालेल्या शानदार दीक्षांत समारंभात रोहित यांच्या खांद्यावर वडील प्रदीप कामत व आई शुभांगी कामत यांनी अधिकारीपदाचे तारे लावले. या नियुक्तीमुळे निपाणी व परिसरात कौतूक होत आहे.

निपाणीचा रोहित कामत बनला लेफ्टनंट
निपाणी : अवकाळीने ऊस तोडणी यंत्रणा जागेवरच

रोहित कामत याचे प्राथमिक शिक्षण निपाणीतील मराठा मंडळ, ५ वी ते १० वी अर्जुननगर (ता. कागल) येथील मोहनलाल दोशी विद्यालय तर १२ वी पर्यंतचे शिक्षण जनता शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवचंद महाविद्यालयात झाले. १२ वी मध्ये महाविद्यालयात त्यांने प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर भारतीय सैन्याच्या टेक्निकल विभागातील अधिकारीपदासाठी घेण्यात आलेली परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर झालेल्या एसएसबी मुलाखतीनंतर त्याची अधिकारी पदाच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. यानंतर गया येथे १ वर्ष, त्यानंतर कॅडेट ट्रेनिंग एमसीईएमई विंग, सिकंदराबाद येथे तीन वर्षे टेक्निकल ट्रेनिंग झाले. गया येथे झालेल्या कार्यक्रमास समिक्षा अधिकारी म्हणून अकॅडमीचे कमाइंट ऑफिसर लेफ्टनंट जनरल जी. व्ही. ए. रेड्डी यांच्यासह काका संदीप कामत, भाऊ सुमित यांनी त्याच्या खांद्यावर अधिकारीपदाचे तारे लावले.

निपाणीचा रोहित कामत बनला लेफ्टनंट
निपाणी : अवकाळी पावसामुळे आडवा झालेला ऊस

या यशाचे श्रेय कुटुंबीयांना आहे. निपाणी व कोल्हापूर येथील काही मागदर्शकांच्यामुळे आपण या पदापर्यंत पोहोचण्यात यशस्वी झालो. वडील, आई, काका व कामत कुटुंबीयांने मला प्रोत्साहन दिले. या यशाचे श्रेय त्यांनाच जाते. सीमाभागातून सैन्यात अधिकारी होणाऱ्या युवकांचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. चिक्कोडी व निपाणी तालुक्यातून मोठ्या पदांवर काम करणारे अधिकारी आता बनत आहेत. त्याचा अभिमान वाटतो. कमी वयायातही खूप काही करण्यासारखे आहे. पण त्यासाठी योग्य मागदर्शन मिळणे गरजेचे आहे.

-रोहित कामत लेफ्टनंट

'शालेय जीवनापासूनच रोहितला सैन्यदलात भरती होण्याची इच्छा होती त्याच्या स्वप्नानुसार आपण सहकार्य केले. याशिवाय माझे भाऊ संदीप कामत यांचेही मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. त्यामुळेच आज तो त्या पदापर्यंत पोहोचू शकला आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे.'

-प्रदीप कामत,लेफ्टनंट रोहित कामत यांचे वडील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com